Union Budget 2021 : अर्थसंकल्पात बस, टेम्पो, रिक्षा चालक आणि कामगारांच्या पदरी निराशाच – बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – डिझेलवर चार आणि पेट्रोलवर अडीच टक्के अधिभार लावण्यात आला आहे. अर्थसंकल्पात ट्रक, बस, टेम्पो, रिक्षा, टॅक्सी अशा वाहतूकदारांसाठी कोणतीही योजना नाही. बस, टेम्पो, रिक्षा चालक आणि कामगारांच्या कल्याणासाठी कोणतीही उपयोजना केल्या नसल्याचे सांगत कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टिका केली आहे.

बाबा कांबळे म्हणाले, कोरोनामुळे सर्व वाहतुकदाराचे मोठं आर्थिक नुकसान झाले. यातून सावरण्यासाठी सरकारने आर्थिक धोरण जाहीर करावे, अशी मागणी होत होती. परंतु याकडे सरकारने दुर्लक्ष केले. पंधरा वर्ष जुनी वाहने भांगरात काढली जाणार आहेत. यामुळे वाहतूकदारांमध्ये नाराजी आहे.

कामगारांसाठी किमान वेतन लागू करण्याबाबत धोरण जाहीर करण्यात आले असले तरी कामगारांना अनेक ठिकाणी किमान वेतन दिले जात नाही. स्थलांतरीत कामगारांसाठी पोर्टल तयार करण्याची घोषणा केली आहे.

केवळ नोंदणी पोर्टल सुरू करुन भागणार नाही‌ तर नोंदीत कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि इतर विविध योजनेचा लाभ दिला पाहिजे, असे मत कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.