Wakad News : देशातील 45 कोटी असंघटित कामगार कष्टकरी जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार एकत्र करू शकतात – बाबा कांबळे

वाकड येथे बांधकाम मजुरांना सुरक्षा साहित्य वाटप; छोटे ठेकेदारांचा मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज – देशातील असंघटित कामगार कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जावे लागेल, हेच विचार देशातील 45 कोटी असंघटित कामगार कष्टकरी जनतेला वाचवतील, बाबासाहेब आंबेकरांनी कामगार मंत्री असताना कामगारांसाठी अनेक कायदे मंजूर केले व कष्टकऱ्यांसाठी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. हा मजूर कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवेल असे बाबासाहेब म्हणाले होते. आज मजुरांसाठी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची अत्यंत गरज आहे असे प्रतिपादन कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले.

वाकड भुमकर चौक येथे कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त असंघटित कामगार मेळावा व बांधकाम मजुरांना सुरक्षा साधनांचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बाबा कांबळे बोलत होते.

यावेळी जिल्हा अध्यक्ष राजू साव, कार्याध्यक्ष मुकेश ठाकूर, उपाध्यक्ष दिनेश यादव, प्रवक्ते महेंद्र जाधव, महाराष्ट्र रिक्षा पंचायत सरचिटणीस शिवाजी गोरे, कष्टकरी जनता महिला गटाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मधुरा डांगे, कार्याध्यक्षा सुषमा बाळसराफ, उपाध्यक्षा स्मिता देशपांडे आदी उपस्थित होते.

बाबा कांबळे पुढे म्हणाले, ” देशात 45 कोटी असंघटित कामगार कष्टकरी आहेत, यात टपरी पथारी हातगाडी धारक, फेरीवाले शेत मजूर, हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजूर यांचा समावेश आहे, यात बांधकाम मजुरांची संख्या मोठी आहे, 2007 साली आम्ही संघर्ष करून बांधकाम मजुरांसाठी सरकारला कायदा करण्यास भाग पाडले, परंतु या कायद्यात गैर प्रकार सुरू असून बांधकाम मजुरांच्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे, भाजपकाळात एक हजार कोटींचे बोगस टेंडर काढण्यात आले, यास आम्ही विरोध केला. आता आघाडी सरकारचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना मजुरांचे प्रश्न ऐकण्यास वेळ नाही

पुणे पिंपरी-चिंचवड शहरात रोज दोन मजुरांचे अपघात होत आहे, यात छोटे ठेकेदार यांच्या वरती जबाबदारी ढकलून मुख्या मलक बिल्डर स्वतःला वाचवत आहेत, मजुरांचा अपघात घडल्यास पोलीस मात्र छोटे ठेकेदार यांच्यावरती गुन्हा दाखल करतात व मुख्य मालक बिल्डर यांना मोकळे सोडतात. अनेक बिल्डरांनी छोटे ठेकेदारांचे पैसे बुडवले आहेत. यामुळे आता छोटे ठेकेदार यांच्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे. छोटे ठेकेदार हे बांधकाम मजूरापैकी किंचित पुढे गेलेला घटक आहे. प्रत्येक साईटवर यांच्यावरती अन्याय होत असल्याचेही बाबा कांबळे यांनी म्हटले.

यावेळी नोदणीकृत बांधकाम मजुरांना सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. बांधकाम मजुरांसाठी स्थापन झालेल्या कल्याणकारी मंडळाची माहिती देण्यात आली. प्रवक्तेपदी महेंद्र कुमार यादव सहसचिवपदी अशोक पासवान, महिला अध्यक्षपदी सुषमा बाळसराफ, उपाध्यक्षपदी स्मिता देशपांडे, यांच्या नियुक्त्या देखील यावेळी करण्यात आल्या. लहान ठेकेदारांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी मानसिंग राजपूत, अभय कुमार सिंह, गुणवंत मालू, निर्मल फुलसुंदर, लक्ष्मण नरवटे, सुखदेव पंडित, यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.