Chakan Crime News : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईप चोरी करणा-या चोरट्यांना अटक, 92 पाईप जप्त

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 120 पाईप 8 ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत खराबवाडी येथून चोरी झाल्या. याबाबत चाकण (म्हाळुंगे) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी चार चोरट्यांना अटक करून, 92 पाईप जप्त केल्या आहेत.

अमोल अर्जुन गोरे (वय 28, रा. वाल्हेकरवाडी, मुळगाव, परांडे, उस्मानाबाद), हनुमंता संगप्पा कट्टिमणी (वय 32, रा. बिजलीनगर, पुणे, मुळगाव कर्नाटक), अतिश राजाभाऊ कांबळे (वय 22, रा. वाल्हेकरवाडी, मुळगाव, हवेली, उस्मानाबाद) आणि सुंदर दोदाप्पा दोडमणी (वय 24, नागसेन नगर, चिंचवड, मुळगाव कर्नाटक) असे अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी त्यांच्याकडून 10 लाख 35 हजार रूपये किंमतीच्या एकूण 92 पाईप जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे 120 पाईप 8 ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत खराबवाडी येथून चोरी झाल्या. शाखा अभियंता यांनी या चोरी बद्दल चाकण (म्हाळुंगे) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला. अटक आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून 10 लाख 35 हजार रूपये किंमतीच्या एकूण 92 पाईप जप्त केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.