Pimpri News – वृक्षारोपणाने साजरी केली गुरुपौर्णिमा

एमपीसी न्यूज – ‘गुरू ही संकल्पना (Pimpri News) धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडची असून ती वैश्विक आहे; तसेच निसर्ग हाच सगळ्यात मोठा गुरू आहे. त्यामुळे वृक्षारोपण करून गुरुपौर्णिमा साजरी करू या!’ अशी संकल्पना सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार यांनी मांडली. 

त्यास चांगला प्रतिसाद देत लायन्स क्लब पूना निगडी, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, सुसंगती ज्येष्ठ नागरिक संघ, एकता ज्येष्ठ नागरिक संघ, पिंपरी – चिंचवड ब्राह्मण महासंघ या संस्थांनी आकुर्डी प्राधिकरणातील पेठ क्रमांक 28, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या जॉगिंग ट्रॅकच्या सभोवती सोमवारी (दि 3) वृक्षारोपण केले.

याप्रसंगी माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, लायन्स क्लब पूना निगडीचे अध्यक्ष अजित देशपांडे, सूर्यकांत मुथीयान, सचिन कुलकर्णी, डॉ. अर्चना वर्टीकर, अमोल देशपांडे, डॉ. विजयसिंह मोहिते, जयंत मांडे, चांदबी सय्यद, जितेंद्र कुलकर्णी, रामकृष्ण मंत्री, किरण सुरवाडे, प्रशांत कुलकर्णी, चंद्रशेखर पवार, अशोक येवले, मारुती मुसमाडे, राजीव कुटे, देविदास ढमे, मीनांजली (Pimpri News)  मोहिते, सीमा बांदेकर, अजय कोल्हे हे पदाधिकारी उपस्थित होते.

Gurupaurnima : मायारूपी भवसागर तरून जायचे असेल तर सदगुरुंची आवश्यकता

यावेळी आंबा, पेरू, सीताफळ, जांभूळ, वड या प्रकारातील सुमारे तीस देशी रोपांचा समावेश होता. याशिवाय साईबाबा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मुन्ना बेग, सचिव विलास शिंदे यांनी सहकार्य केले. मनोज देशमुख आणि प्रसेन अष्टेकर यांनी संयोजन केले. सलीम शिकलगार यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.