Pimpri news: निगडीत पोलीस आयुक्तालयामार्फत ज्येष्ठांकरीता आनंदी जीवन मार्गदर्शन मेळावा

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत ‘ज्येष्ठांकरीता आनंदी जीवन मार्गदर्शन मेळावा’ आयोजित (Pimpri news) करण्यात आला आहे. प्राधिकरणमधील सेक्टर 27 ‘अ’ येथील कृष्णा सहकारी गृह रचना संस्था हॉलमध्ये शनिवारी 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे. अनेक ज्येष्ठांची या मेळाव्याला उपस्थिती असणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ‘आनंदी मार्गदर्शन मेळावा’ घेणार आहेत. सदर मार्गदर्शन मेळाव्यामध्ये ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या विविध समस्याचे निराकरण तसेच मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक प्रश्नोत्तराच्या कालावधीत त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून शंका निरसन केले जाणार आहे.

Pimpri News : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून दोन रानमांजरीच्या पिल्लांना जीवदान

यावेळी पोलीस अधिकारी, कृष्णा सहकारी संस्थाचे अध्यक्ष- बाबुराव फडतरे, सचिव- अनिल चव्हाण, इतर सदस्य व नागरिक उपस्थित राहणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निराकरणासाठी (Pimpri news) तसेच आनंददायी, सुरक्षित आणि निश्चिंत आयुष्य जगण्यासाठी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून आनंदी मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णा सहकारी संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.