Pimpri News : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून दोन रानमांजरीच्या पिल्लांना जीवदान

एमपीसी न्यूज : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून (Pimpri News) दोन रान मांजरीच्या पिल्लांना जीवदान देण्यात आले आहे. बुधवार 14 डिसेंबर रोजी गोदुंब्रे, मावळमध्ये काही धनगरांना शेळी चारताना एका शेतात रानमांजरची 2 पिल्ले आढळून आली. तसेच, त्यांनी लगेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विनय सावंत यांना माहिती दिली.

वेळ न घालवता वनविभाग व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विनय सावंत, निनाद काकडे, जिगर सोलंकी, रोहित पवार यांनी पिल्लांना रेस्क्यू करून तळेगाव येथील डॉ. धडके यांच्याकडे प्राथमिक उपचार करून पिल्लं एकदम व्यवस्थित आहेत याची माहिती वडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना दिली. त्यांच्या या निरिक्षणाखाली पिल्लांना त्यांच्या आईसोबत रियुनियन करण्यासाठी ठेवले होते. मध्यरात्री आई पिल्लांना घेऊन गेली.

PCET University : ‘असे’ असेल ‘पीसीईटी’चे पिंपरी चिंचवड विद्यापीठ

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे (Pimpri News) संस्थापक निलेश संपतराव गरडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, गणेश निसाळ यांनी लोकांना आवाहन केले आहे, की कोणतेही वन्यप्राणी आढळून आले, तर त्याच्यापासून लांब रहावे आणि गरज असल्यास वनविभागाला त्यांच्या 1926 या टोल फ्री नंबरवर संपर्क करावा. आणि कोणतेही वन्य प्राणी पाळू नये किंवा मारू नये. ही लोकांना विनंती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.