PCMC: विद्यार्थ्यांच्या बौद्धीक विकासासाठी “अर्बन आउटकम फ्रेमवर्क’ उपक्रम महत्वाचा – अतिरिक्त आयुक्त जांभळे

एमपीसी न्यूज – शालेय जिवनात विद्यार्थ्यांचा बौद्धिक, संज्ञानात्मक विकासासाठी (PCMC) आणि दर्जेदार शिक्षणात वाढ होण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘अर्बन आउटकम फ्रेमवर्क’ उपक्रमाचे महत्त्व पटवून द्या, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी आवाहन केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून ‘अर्बन आउटकम फ्रेमवर्क 2022’ अंतर्गत ‘आपले शहर जाणून घ्या’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये शहरातील मनपा व खाजगी शाळा, महाविद्यालयांचा सहभाग वाढवा, यासाठी शहरातील निळू फुले रंगमंदिर येथे मुख्याध्यापक व प्राचार्य यांना मार्गदर्शन करताना ते अतिरिक्त आयुक्त जांभळे बोलत होते. यावेळी, उपायुक्त संदीप खोत, फाक्सबेरीचे संचालक अंकित भार्गव यांच्यासह 100 हून अधिक मनपा व खाजगी शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य कार्यक्रमाला उपस्थित होते.

PCET University : ‘असे’ असेल ‘पीसीईटी’चे पिंपरी चिंचवड विद्यापीठ

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अर्बन आउटकम फ्रेमवर्क 2022 अंतर्गत ‘आपले शहर जाणून घ्या’ या मोहीमेची घोषणा करण्यात आलेली आहे. शहरातील मनपा व खाजगी शालेय (PCMC) विद्यार्थ्यांना संज्ञानात्मक विकास आणि दर्जेदार शिक्षण आणि 21 व्या शतकातील प्रमुख कौशल्यांनी सुसज्ज सर्वांगिण, सर्वगुण संपन्न व्यक्ती बनवून मुलांची विविध पार्श्वभूमी, बहुभाषिक गरजा आणि शैक्षणिक क्षमतांचा विचार करणाऱ्या स्वतःच्या शिक्षणात सक्रिय सहभागी होण्याकरीता अर्बन आउटकम फ्रेमवर्क 2022 अंतर्गत ‘आपले शहर जाणून घ्या’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

यामध्ये, महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थांचा सहभाग वाढविणे तसेच मोहिमेचे नियोजन करण्यासाठी मुख्याध्यापकांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी उपस्थितांना व्हिडीओ चित्रफीतीद्वारे संवाद साधला. स्मार्ट सारथी टीमद्वारे ‘अर्बन आउटकम फ्रेमवर्क 2022’ अंतर्गत शहरात राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.