Pimpri News : राष्ट्रवादीच्या जन जागर यात्रेला मिळाला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – वाढती महागाई, बेरोजगारीविरोधात काढण्यात येत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pimpri News) जनजागर यात्रेस पिंपरी-चिंचवड शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व सामान्य जनतेने उत्स्फूर्तपणे  यात्रेचे स्वागत केल्याचे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय महिला अध्यक्ष खासदार फौजिया खान यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, राज्य निरिक्षक डॉ.आशा मिरगे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, कविता म्हेत्रे, वैशालीताई नागवडे, शितल हगवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेची सुरुवात केली.

जनजागर यात्रेत प्रामुख्याने महागाई, बेरोजगारी, वेतन, बेताल वक्तव्य, शेतकरी असंतोष, महिला सुरक्षा, अशा सर्व विषयांवर यल्गार करण्यात आला. या यात्रेत सर्व नेते आजी-माजी नगरसेवक, अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सहभाग होता. जनजागर यात्रेच्या माध्यमातून पिंपरी व भोसरी विधानसभेत प्रत्येक दोन कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम पिंपरी येथे डीलक्स चौक, पिंपरी याठिकाणी तेथील सर्व सामान्य नागरिकांच्या उपस्थितीत सभा घेऊन प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर खंडोबा माळ चौक, आकुर्डी (Pimpri News) तसेच रुपीनगर-तळवडे व शेवटची सांगता सभा पीएमटी चौक, भोसरी येथे घेण्यात आली.

Lonavala News : विविध विकास कामांचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमिपूजन

शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते  नाना काटे, राहुल भोसले, शाम लांडे, विनोद नढे, फजल शेख, पंकज भालेकर, विक्रांत लांडे, उषा वाघेरे, हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी, निकिता कदम, कविता खराडे, वर्षा जगताप, इम्रान शेख, यश साने, विनायक रणसुभे, सतीश दरेकर, संजय उदावंत, दिपक साकोरे, विजय लोखंडे, जगन्नाथ साबळे, अक्षय माछरे, संजय औसरमल, इकलास सय्यद, वैशाली काळभोर, प्रसाद कोलते, विशाल काळभोर, संगीता ताम्हाणे, प्रवीण भालेकर, नारायण बहिरवाडे, संजय वाबळे, पौर्णिमा रविंद्र सोनवणे, दत्तात्रय जगताप, सारिका पवार, शितल पवार, युवराज पवार, संदीपान झोंबाडे, संतोष निसर्गंध, चंद्रकांत वाळके, जालिंदर बापू शिंदे, अनुराधा गोफणे, प्रसाद कोलते, मंदाताई आल्हाट, विनया तापकीर, अमिना पानसरे, शमीम पठान, गोरक्ष लोखंडे, सुरेखा लांडगे, स्वाती माई काटे, उषा काळे, शांती सेन, तृप्ती मोरे, सचिन औटे, सुनिता अडसुळ, सुप्रिया सोळांकुरे, लता ओव्हाळ,  संगिता कोकणे, ज्योती तापकिर, मिरा कदम, पूनम वाघ, मनिषा गटकळ, ज्योती गोफणे, सविता धुमाळ, विश्रांती पाडाळे, दिपाली देशमुख, मिरा कुदळे, सारीका पवार, पल्लवी पांढरे, निर्मला माने, विष्णू शेळके, किरण देशमुख, विनय शिंदे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते (Pimpri News)उपस्थितीत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.