Talegaon : ट्रेलर व कारच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ट्रेलर व कारच्या धडकेत कार (Talegaon) चालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात चाकण-तळेगाव दाभाडे रोडवर सोमवारी (दि.2 जानेवारी) झाला होता. उपचारादरम्यान कार चालकाचा मृत्यू झाल्याने गुरुवारी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

या अपघातात इरटिगा कारचा (एमएच 01 बीयू 7111) चालक गजराज फत्ते सिंग (वय 41 रा. अंधेरी, मुंबई) याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी ट्रेलर चालक (एमएच 46 बी.एम 6591) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Lonavala News : विविध विकास कामांचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमिपूजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-तळेगाव दाभाडे रोडवर ट्रेलर (Talegaon) चालकाने भरधाव वेगात राँग साईडने जात असताना समोरून येणाऱ्या इर्टिगा कारला जोरदार धडक दिली. यामध्ये गजराज गंभीर जखमी झाले व त्यांच्या कारचे पाच लाखांचे नुकसान झाले, यावेळी ट्रेलर चालकाने तेथे थांबून जखमीला मदत न करता पळ काढला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.