Nigdi News : भक्ती-शक्ती उद्यानाचे सुशोभिकरण करा – सचिन चिखले

एमपीसी न्यूज – भक्ती-शक्ती उद्यानाकडे प्रशासनाचे (Nigdi News) साफ दुर्लक्ष झाले आहे. उद्यानाची दुरावस्था झाली आहे. या उद्यानाचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे. पालिकेने उद्यानाचे सुशोभिकरण करावे. अन्यथा पालिकेला भक्ती- शक्तीचे चिन्ह वापरण्याचा काहीच अधिकार राहणार नाही असेही त्यांनी म्हटले.

याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी भक्ती-शक्ती उद्यान सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाची स्मरण करून देणारे उर्जास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वगुणसंपन्न शक्ती व श्री संत तुकाराम महाराजांची निष्काम भक्ती व असंख्य स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानातून अभिमानाने उंचावलेला व राष्ट्रभक्ती जागृत करणारा राष्ट्रध्वज असा त्रिवेणी संगम या ठिकाणी साकार झालेला आहे. असे हे उर्जास्थान सन 2000 मध्ये लोकार्पण करण्यात आल्यापासून विकासापासून वंचित राहिले आहे. भक्ती-शक्ती उद्यान अनेकांचे प्रेरणास्थान आहे. परंतु, भक्ती-शक्ती उद्यानाकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झालेले आहे.

भक्ती-शक्ती उद्यानातील साउंड सिस्टीम गेली 5 वर्ष बंद आहे. उद्यानातील स्मारकाभोवती S.S. मटेरीअलमध्ये राउंड ग्रिल बसवावेत. भक्ती-शक्ती उद्यानातील पिण्याच्या पाण्याची टाकी लहान असल्यामुळे नागरिकांना पाणी पुरत नाही, त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. उद्यानात स्वच्छातगृह नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उद्यानातील सीमाभिंत पडलेल्या अवस्थेमध्ये आहे, याकडे दुर्लक्ष आहे. उद्यानातील नवीन जनरेटर घेतलेला आहे, परंतु तो बंद अवस्थेमध्ये (Nigdi News) आहे. त्याची सध्याची क्षमता 15 K.V. असून तो कमीत कमी 50 K.V. असणे अपेक्षित आहे.

Talegaon : ट्रेलर व कारच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू

भक्ती-शक्ती उद्यानातील स्माराकाभोवतीचे सर्व ग्रेनाइट तुटलेले अवस्थेमध्ये आहे. उद्यानातील स्मारकाभोवतील आवारात रात्री सर्व ठिकाणी अंधार असतो. त्यामुळे गैरसोय होते. उद्यानातील भगवा झेंडा आकाराने मोठा करण्यात यावा. उद्यानातील स्मारकास हार घालण्यासाठी पाठीमागच्या बाजूने शिडी तयार करण्यात यावी. उद्यानातील स्मारक आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे. भक्ती-शक्ती उद्यानाचे काम संपूर्ण दगडी बांधकामात व किल्ल्यासारखे बुरुज करावेत. लवकरात लवकर भक्ती-शक्ती उद्यानाचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी चिखले यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.