Pimpri News : व्हॅलेनटाईन डे निमीत्त पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भन्नाट ट्वीट करत नागरिकांना सावधानतेचा इशारा

एमपीसी न्यूज- ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियन बॅटसमन क्रिकेट मॅचच्या आधी पीच चे परिक्षण करतो त्या प्रमाणे आज व्हॅलेनटाईन डे ला तुम्ही देखील (Pimpri News)  मॅसेज व  विविध ऑफर या पारखून ओपन करा असा सल्ला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्विटरद्वारे नागरिकांना दिला आहे.

त्यांच्या या ट्विट ला नागरिकांनीही व्हॅलेनटाईन डे निमीत्त सर्वांना मोबाईल किंवा ईमेलवर विविध ठिकाणाहून शुभेच्छा किंवा ऑफर येतात, त्यात तुम्हाला गिफ्ट मिळेल किंवा मैत्रीसाठीही रिक्वेस्ट येतात. यावेळी नागरिक अशा फसव्या मॅसेजना सहज बळी पडतात त्याना सावध कऱण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर  टीमने हे ट्वीट केले आहे.

Chikhli News : पती-पत्नीच्या मध्ये येतो म्हणून तरुणाला मारहाण

यात पोलिसांनी म्हटले आहे की, स्टीव्ह स्मीथचा खाली वाकून पीच चे निरीक्षण करतानाचा फोटो टाकला असून त्याला कॅपशन दिले आहे की, जसे स्टीव्ह स्मीथ मैदानावर पिचकडे संशयाने (Pimpri News) बघतो तसेच फसव्या व्हॅलेटाईन डे गिफ्ट ऑफर मॅसेज ला संशस्यापद नजरेने बघा असा मैत्रिचा व सावधानतेचा सल्ला देत पोलिसांनी नागरिकांना व्हॅलेनटाईन डे चे वीश केले आहे. त्यासाठी त्यांनी #BeCyberSafe#OrloseYourMatch असे हॅशटॅग वापरले आहे.

नागरिकांनीही त्यालाा हसून मजेशीर रिप्लाय दिले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस नवीन आयुक्त आल्यापासून ट्वीटरवर अॅक्टीव्ह झाले आहेत, त्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहेत.पोलिसांच्या या जनजागृतीलाही नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.