Chikhli News : पती-पत्नीच्या मध्ये येतो म्हणून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – पती-पत्नीच्या मध्ये का येतोस म्हणत 20 वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात (Chikhli News)आली आहे. हा प्रकार रविवारी (दि.12) कुदळवाडी येथे घडली आहे.

याप्रकरणी मोहम्मद अनस चौधरी (वय 20 रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून आरशद अकबरअली खान (वय 30) व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vadgaon Maval : वडगाव भाजपा आणि युवक प्रतिष्ठानच्या वतीने 455 नागरिकांना श्रवणयंत्रांचे वाटप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आरोपीकेड काही कामानिमीत्त गेले असता आरोपीने तू माझ्या व माझ्या पत्नीचे मध्ये का येतोस, आमचे आम्ही पाहून घेऊ असे म्हणत शिवीगाळ (Chikhli News) करण्यास सुरुवात केली. तसेच लाकडी बांबू व पीव्हीसी पाईपने मारहाण करून जखमी केले तसेच तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.