Pimpri News: महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण, खासदार संभाजीराजे म्हणतात..

एमपीसी न्यूज – राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तान सत्ताधारी व विरोधकांकडून सरकारच्या कामाचे विश्लेषण सुरू झाले आहे. याबाबत राज्यसभा खासदार संभाजीराजे यांना विचारले असता ”मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. सहा महिने माझे मुदत राहिली असून ती संपल्यानंतर माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेल”, असे त्यांनी सांगितले.

संभाजीराजे पिंपरी-चिंचवड दौ-यावर होते. चिंचवड येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याकडे तुम्ही कसे पाहता असे विचारले असता. संभाजीराजे म्हणाले, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे मी कोणत्याही राजकीय विषयावर संभाषण करणार नाही. माझी मुदत अजून सहा महिने राहिली आहे. सहा महिने माझे संपतील. त्यावेळी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेल.

औरंगाबाद जिल्हा परिषदेने जिल्ह्याला संभाजीनगर नाव देण्याचा ठराव केला आहे. त्याबाबत विचारले असता संभाजीनगर नाव द्यायला काहीच हरकत नाही असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.