Pimpri News : गोल्ड फ्लेक सिगारेटचे बनावट कॉपीराईट वापरल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – आयटीसी कंपनीच्या गोल्ड फ्लेक सिगारेटचे (Pimpri News) बनावट कॉपीराईट वापरून विक्री करणाऱ्या दोन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही दुकानदारांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 97 हजार 700 रुपये किमतीचे 580 सिगारेटचे पॅकेट जप्त केले आहेत.

 

 

मोहनलाल गोमाजी भाटी (वय 51रा. संभाजीनगरथेरगाव)गणेश सुवालाल गांधी (वय 34रा. पवारनगरथेरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारआयटीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात येऊन तक्रार दिली. पिंपरी-चिंचवड परिसरातील काही दुकानदार आयटीसी कंपनीचे उत्पादन असलेली गोल्डफ्लेक सिगारेटच्या नावाने बनावट सिगारेट विकत असल्याची तक्रार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

Pune Crime News : एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

 

त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने आयटीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून पिंपरी आणि वाकड परिसरात छापे मारले. काळेवाडी फाटा येथे गणेश ट्रेडिंग आणि मुकेश किराणा स्टोअर्स येथे पोलिसांना बनावट कॉपीराईट केलेले सिगारेटचे एकूण 29 आऊटर (एक आऊटरमध्ये 20 पॅकेट) असा 97 हजार 700 रुपयांचा साठा आढळून आला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड (Pimpri News) पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.