Pune Crime News : एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज- मैत्रीचे संबंध असताना देखील एकतर्फी प्रेमातून तरूणाने अल्पवयीन तरुणीचा विनयभंग  ( Pune Crime News )करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कात्रज परिसरात घडला. त्याला विरोध केल्यानंतर माझ्याशी लग्न कर नाही तर जीव देईन, अशी धमकीही त्याने दिली.

 

याप्रकरणी कात्रज येथील एका 17 वर्षाच्या मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम गंगाधर शेडगे (वय 22 , रा. नायगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 28 फेब्रुवारी पासून शनिवारपर्यंत घडला.

 

Pune Crime News : इन्स्टाग्रामवर झालेली ओळख महिलेला पडली चांगलीच महागात,14 लाख रुपयांची फसवणूक

 

शुभम हा त्यांच्या ओळखीचा असून त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. कात्रज बसस्टॉपजवळ असताना शुभम तेथे आला. त्याने मुलीशी लगट करुन चुंबन घेऊन लज्जास्पद वर्तन केले. मुलीने विरोध केल्यावर त्याने ‘माझ्याशी लग्न कर नाही तर मी जीव देईल आणि तुझे पण नीट नाही होऊ देणार’ असे म्हणून मुलीच्या घरापर्यंत पाठलाग ( Pune Crime News ) केला.

तिच्या वडिलांना शिवीगाळ करुन धमकी दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.