Pune Crime News : इन्स्टाग्रामवर झालेली ओळख महिलेला पडली चांगलीच महागात,14 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज-इन्स्टाग्रामवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच ( Pune Crime News ) महागात पडली असून, गिफ्ट पाठवायची बतावणीकरून तब्बल 14 लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात अनोळखी खातेधारकावर गुन्हा नोंद केला आहे. याबाबत 42 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

तक्रारदार महिलेला इन्स्टाग्रावर स्विडनमधील व्यक्तीने फ्रेंड रिकव्हेस्ट पाठविली होती. ती त्यांनी स्विकारली. त्यानंतर त्यांच्यात ओळख झाली व ते व्हॉट्सअपद्वारे चॅटिंग सुरू झाले.

MPC News Podcast 13 March 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

याव्यक्तीने तरुणीला गिफ्ट पाठवायचे असल्याचे सांगत त्यांच्या ऑफिसचा पत्ता घेतला. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादनकरून त्यांना गिफ्टचे डिलीव्हरी चार्जेस म्हणून प्रथम 72 हजार रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण 14 लाख रुपये उकळले.

परंतु, त्यांना गिफ्ट पाठविले नाही. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचा ( Pune Crime News ) संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.