Pune Crime News : जॉबच्या शोधात असणाऱ्या तरुणीला वेश्याव्यवसायाची ऑफर, नकार देताच केला विनयभंग

एमपीसी न्यूज- जॉबच्या शोधात असणाऱ्या तरुणीचा फ्लॅटवर नेहून(Pune Crime News ) विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणीला सेनापती बापट रस्त्यावर बोलवून प्रथम तिला मसाजचा जॉब देऊ असे म्हणत वेश्या व्यवसाय करण्यास सांगितले. परंतु, तिने नकार दिल्यानंतर तिला फ्लॅटवर नेऊन अश्लील कृत्य केले.

याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, भारत जोशी व किशोर चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून, तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा नोंद केला.

Pimpri News : गोल्ड फ्लेक सिगारेटचे बनावट कॉपीराईट वापरल्या प्रकरणी दोघांना अटक

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार तरुणीला जॉबची आवश्यकता होती. यादरम्यान, दोघांनी या तरुणीला सेनापती बापट रस्त्यावर बोलावले होते. तरुणी आल्यानंतर तिला बॉडी मसाजचा जॉब करावा लागेल. तसेच, जो समोरचा व्यक्ती म्हणेल तसे करावे लागेल असे म्हणत तिच्या मनात लज्जा उत्पन्न केली. त्यानंतर या तरुणीला दुसरा जॉब दाखविण्याच्या बहाण्याने पिंपळे निलख परिसरातील एका फ्लॅटवर नेहून तिच्याशी (Pune Crime News ) अश्लील कृत्य केले. त्यानंतर या तरुणीने तावडीतून सुटकाकरून घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.