Pimpri news: ‘ब्रेक द चेन’ ! अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने राहणार बंद

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश; पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रासाठी कलम 144 लागू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दररोज नवीन उच्चाक होत असल्याने महापालिका प्रशासनाने कठोर निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठ, मॉल्स, जीम 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद राहणार आहेत. सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने, क्रीडांगणेही बंद राहणार आहेत. याबाबतचा सविस्तर आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे.

संपूर्ण  पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्र येण्यास मनाई आहे. वैध कारण, परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी सर्वांना मनाई करण्यात आली आहे. वैद्यकीय आणि जीवनावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. त्यांच्या वाहतुकीला निर्बंध असणार नाहीत.

‘हे’ सुरू राहणार !

अत्यावश्यक सेवा आणि संबंधित दुकाने, रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाना, वैद्यकीय विमा कार्यालये,औषध दुकाने, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय, आरोग्य सेवा, भाजी मंडई, किराणा सामान दुकाने, भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, स्वीट मार्ट, प्रवासी बस, कॅब, रिक्षा, रेल्वे, एसटी, मालवाहतूक, ई- कॉमर्स, आयटी सेवा, सरकारी व खासगी सेवा, वृत्तपत्रे कार्यालये आणि पेट्रोल पंप तसेच खासगी संस्थाना सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या अटीवर आठवड्याचे सर्व दिवस सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी असेल.

ज्याचे लसीकरण झाले नाही. त्यांच्याकडे 15 दिवसांसाठी ग्राह्य असलेली आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्हचे प्रमाणात असणे आवश्यक राहील. हा नियम 10 एप्रिल पासून लागू राहील. आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्हचे प्रमाणपत्र, लसीकरण केलेले नसल्यास एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.

फायनान्स संस्था, वकिलांची कार्यालये खुली राहतील. कंपनी ओळखपत्राच्या आधारे संध्याकाळी सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत तसेच शनिवार आणि रविवारी खासगी बस, अथवा वाहनाने प्रवेश करणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना परवानगी राहील. धार्मिक स्थळे, उपासनेची ठिकाणे नागरिकांसाठी पूर्ण बंद आहेत. परंतु, तिथे कामकाज करण्याची मुभा राहील.

अत्यावश्यक सेवांच्या दुकानात सुरक्षित अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे. सरकारच्या निकषानुसार जीवनाशयक वस्तू दुकानाचे मालक आणि सर्व कामगारांनी लसीकरण करून घ्यावे.

रिक्षात चालक आणि दोन प्रवाशी, टॅक्सीत चालक आणि वाहनाच्या 50 टक्के क्षमतेएवढे प्रवासी असल्यास परवानगी, मास्क बंधनकारक, मास्क नसल्यास 500 रुपये दंड, प्रत्येक फेरीननंतर निर्जंतुकिकरण आवश्यक, सर्व सहकारी, सरकारी, खासगी बँका, विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्या, दूरसंचार सेवा देणाऱ्या संस्था, विमा, आरोग्य कंपन्या वगळता सर्व खासगी काद्यालये बंद राहतील.

सरकारी कार्यालये 50 टक्के मनुष्यबळसह सुरू राहतील. वीज, पाणी, बँकिंग आणि इतर वित्तीय सेवा संबंधित सरकारी कंपन्या, सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेसह कार्यरत राहतील. बैठका ऑनलाईन घेण्यात याव्यात. सर्व प्रकारच्या खासगी बसेससह खासगी वाहने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत चालू राहतील. आसन क्षमतेएवढेच प्रवासी असणे आवश्यक आहे.

50 लोकांच्या उपस्थित लग्नाला परवानगी, अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी, रस्त्यावरील खाद्य पदार्थच्या स्टॉलवर पदार्थ खाण्यास मनाई, परंतु, सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत पार्सल सेवा सुरु ठेवण्यास परवानगी राहील.

कोरोनाच्या नियमांचे पालन करून उत्पादन क्षेत्र सुरू राहील. ज्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अशा बांधकांमाना परवानगी राहिल. कामगाराची ने-आन करण्यात येवू नये. साहित्याची वाहतूक करण्यास परवानगी राहील.

बांधकामाच्या ठिकाणी कोणालाही कोरोनाची लागण झाल्यास त्याला, त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना पगारी रजा मंजूर करून अलगीकरणं करून घ्यावे. नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकास पहिल्यांदा दहा हजार रुपये दंड आकारून वसूल करण्यात येईल.

तथापि, वारंवार असे घडल्यास बांधकाम साईट बंध करण्यात येईल. हे नियम 30 एप्रिल 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

‘हे’ बंद राहणार !

सिनेमागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क, अम्युजमेंट पार्क, स्वीमिंग पूल, जिम, क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब संपूर्णतः बंद राहील. राहण्याची सुविधा असलेल्या हॉटेलचा अविभाज्य भाग वगळता संध्याकाळी सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद राहतील.

हॉटेल पार्सल सुविधा सुरू राहील. सलून, ब्यूटी पार्लर, बंद राहणार, सर्व शाळा, महाविद्यालये, परीक्षेसाठी मर्यादेत शिथिल केले जातील. ,खासगी क्लासेस, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.

कच्चा माल म्हणून ऑक्सिजनचा निववळ वापर असणाऱ्या सर्व औद्योगिक प्रक्रिया 10 एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहेत. आशा प्रकारच्या संस्थेने कारणे स्पष्ट करून प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक राहील. अन्यथा उत्पादन बंद करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.