Pimpri : नोव्हेल कॉलेज मध्ये युवा सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज : नोव्हेल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी आणि लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी टू ची युथ कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने युवा सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात तरुण वयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी (Pimpri) केलेल्या 10 युवक-युवतींना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रांतपाल एम जे एफ लायन राजेश कोठावदे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थिंना स्मृतिचिन्ह , प्रशस्तीपत्र आणि ‘मन मे है विश्वास’ हे पुस्तक भेट देऊन सन्मानीत करण्यात आले.  

स्वतःच्या अपंगत्वावर जिद्दीने मात करून कुबडीच्या साह्याने रायगड सर करणाऱ्या ओंकार लकडे या विद्यार्थ्याला विशेष लक्षवेधी सन्मान देण्यात आला. पूजा तानाजी बुधावले (योग आणि एकतेच्या प्रचारार्थ 8000 किलोमीटर पार करणारी सायकलस्वार), मुसर्रत नईम शेख (मेहंदी आर्टिस्ट), श्रावणी राजेंद्र देसाई (क्रिकेट प्लेअर), स्वरूप राजीव काळे (एक्झिक्युटिव्ह शेफ), श्रावणी लडकत गाडगे (रिसर्चर), संदीप सुभाष दहिसरकर (अकॅडेमिशियन), आशिष शरद माने (गिर्यारोहक), शिवाजी जगन्नाथ राजगे (हॉटेल व्यावसायिक), श्रुती सतीश अमृतकर (आर्किटेक्ट) आणि ओवी विनय सातपुते (स्कुबा डायव्हर) या दहा युवक-युवतींना त्यांच्या क्षेत्रातील भरीव कामगिरीकरिता गौरवण्यात आले. या असामान्य युवांचा सन्मान करून आजच्या तरुण पिढी समोर योग्य आदर्श निर्माण करणे हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश होता.

Pune : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बाळासाहेब देवरस रूग्णालयाचा भूमिपूजन सोहळा आयोजित

या सोहळ्याला विशेष अतिथी नोव्हेल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे आणि प्रमुख वक्ता म्हणून माजी प्रांतपाल एम जे एफ लायन बी. एल. जोशी सर लाभले होते. (Pimpri) आर सी लायन अनिल झोपे व आर सी लायन दिलीपसिंह मोहिते हे देखील उपस्थित होते. अतिशय दिमाखदार रीतीने संपन्न झालेल्या या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, पुरस्कारार्थींचे नातेवाईक व अनेक लायन्स सदस्य उपस्थित होते.

प्रमुख संयोजक लायन शैलजा सांगळे, डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन युथ आऊटरिच कमिटी आणि NIBR कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे प्राचार्य वैभव फंड यांनी संयोजन समितीच्या मदतीने कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. या सोहळ्यात 23 लायन्स क्लब्स सहभागी झाले होते.(Pimpri) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पारेख यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.