Pune : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणार बाळासाहेब देवरस रूग्णालयाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज : सामान्य रूग्णांसाठी आवाक्यातील खर्चात गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवांच्या उद्देशाने पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान संचलित बाळासाहेब देवरस रूग्णालयाचा भूमिपूजन सोहळा शनिवार, 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे.(Pune) कात्रज भागातील खडी मशीन चौकात 800 बेडचे हे रूग्णालय दोन टप्प्यात उभारले जाणार आहे. अशी माहिती बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिकचे अध्यक्ष शिरीष देशपांडे आणि कार्यवाह बद्रीनाथ मूर्ती  यांनी दिली. 

या  भूमिपूजन समारंभाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडवीय, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश उर्फ भैय्याजी जोशी, पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानचे मानद अध्यक्ष  व राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदर पूनावाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

खडी मशीन चौकातील प्रस्तावित 800 बेडचे सुसज्ज रूग्णालय व अद्ययावत वास्तुच्या भूमिपूजन सोहळा समारंभ पुणे- सातारा रस्त्यावरील बिववेवाडी स्थित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात सकाळी 10.30 वाजता होणार आहे.  या भूमिपूजन सोहळ्यासाठी नागरिकांनी  लक्षणीय संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Pune : सलोखा योजनेंतर्गत एक हजार रुपयांच्या नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्कात होणार शेतजमिनीची अदला बदल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय संघचालक श्रद्धेय बाळासाहेब देवरस हे आणीबाणीतील काही वर्षे पुण्याच्या येरवड्याच्या तुरूंगात होते आणि आयुष्यातील शेवटची काही वर्षे  मित्रमंडळ चौकात स्थित कौशिक आश्रमात त्यांचा निवास होता. सेवेच्या आयामाला त्यांनी दिलेली दिशा याचा विचार व दृष्टी समोर ठेवून त्यांचेच नाव या रुग्णालयाला द्यावे असे प्रतिष्ठानने ठरविले.

पुण्यातील अनेक तज्ज्ञ व मान्यवर डॉक्टरांच्या टीमची या प्रकल्पासाठी मदत घेऊन याचे सविस्तर नियोजन होते आहे. मान्यवर आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिकाची या प्रकल्पासाठी निवडून (Pune) 2025 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे होत असताना या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.