Pimpri : शिवजयंतीनिमित्त पिंपरीत घुमणार राज्यातील नामवंत मल्लांचा शड्डू!

एमपीसी न्यू ज –  अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव 2024 निमित्त यंदा ( Pimpri) पिंपरीगाव येथे आज (मंगळवारी) शिवशंभू केसरी जंगी कुस्तांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात निमित्त यंदा ( Pimpri) पिंपरीगाव येथे आज (मंगळवारी) शिवशंभू केसरी जंगी कुस्तांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले असून या आखाड्यात राज्यभरातील नामवंत मल्लांच्या शड्डूचा आवाज घुमणार आहे. तसेच कुंभमेळ्यातील प्रमुख महाकाल टोळी या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवारी (दि. 28 मार्च) सकाळी शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात श्रीशिव मूर्तीस अभिषेक, होम हवन आणि शिवजन्मोत्सव पाळणा आदी  कार्यक्रम होणार आहेत. तसेच सांयकाळी 4 वाजता श्री शिवछत्रपतींची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

PCMC : पिंपरी महापालिकेचे पाच जलतरण तलाव अद्यापही बंदच

शोभायात्रा पिंपरी कॅम्प येथील शगुन चौक येथून निघून पिंपरीगाव येथील भैरवनाथ चौक येथे असलेल्या शिवस्फूर्ती स्मारक याठिकाणी शोभयात्रेची सांगता होईल. या शोभायात्रेत महाकाल टोळीबरोबरच भव्य मिरवणूक रथ, भव्य साउंड सिस्टिम, लाईट शो, ढोल ताशा पथक, फटाक्यांची आतिषबाजी आणि महाराजांची आकर्षक पालखी हे खास आकर्षण असणार आहे.

दरम्यान शिवशंभू केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे विरुद्ध हिंद केसरी पै. सोनू कुमार, महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख विरुद्ध हिंद केसरी पै. छोटा गनी आणि उपमहाराष्ट्र केसरी पै. माऊली कोकाटे विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर या नामवंत मल्लांच्या कुस्तीचा आनंद पंचक्रोशीतील तमाम कुस्तीप्रेमींना घेता येणार आहे. ही स्पर्धा पिंपरीगाव येथील नव महाराष्ट्र शाळेच्या पटांगणावर पार पडणार आहे. या शिवजन्मोत्सव सोहळ्याला पंचक्रोशीतील तमाम शिवभक्तांनी आणि कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समिती आणि पिंपरी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात ( Pimpri) आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.