Pimpri : संतोष दोरवड ठरला ‘श्री काळभैरवनाथ केसरी’ चा मानकरी

एमपीसी न्यूज – पिंपरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज यांचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. निकाली कुस्तीमध्ये संतोष दोरवड़ याने चांदीची गदा व दीड लाखाचे बक्षीस पटकावले. बुधवार (दि. 8) रोजी पहाटे पाच ते सात या वेळेत श्री काळभैरवनाथ महाराजांना अभिषेक व महापूजा करण्यात आली.

रात्री नऊ वाजता श्री काळभैरवनाथ महाराज यांच्या पालखीची छबिना मिरवणूक काढण्यात आली. गुरुवार (दि. ९) रोजी दुपारी साडेतीन वाजता नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणावर काळभैरवनाथ चषक कुस्त्याचा आखाडा झाला. कुस्त्यांसाठी सहा लाख रुपये व चांदीची गदा याप्रमाणे बक्षीस ठेवण्यात आले होते. श्री काळभैरवनाथ केसरी किताब संतोष दोरवड याने पटकावला. त्याला दीड लाख रुपये रोख व चांदीची गदा देण्यात आली.

श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव समितीचे मुख्य प्रवर्तक व पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी संदीप कापसे, उत्सव कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.