Pimpri – सतीश दरेकर इलेव्हन संघाने पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा जिंकली

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन च्यावतीने,(Pimpri) कै.चंद्रकांत साठे (आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच)यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली मर्यादित 20 षटकांची स्पर्धा सतीश दरेकर इलेव्हन संघाने जिंकली असून यावेळी मावेरीकस क्रिकेट अकॅडमीच्या संघाचा त्यांनी 14 धावांनी पराभव केला.

ही स्पर्धा दिनांक 27ऑक्टोबर 2023,शुक्रवार रोजी संपन्न झाली. या स्पपर्धेतील सामने सिल्वर क्रिकेट अकॅडमी, परंदवल क्रिकेट अकॅडमी व अचीवर क्रिकेट अकॅडमी येथील मैदानावर खेळविण्यात आले.

या स्पर्धेत सतीश दरेकर इलेव्हन संघाने (Pimpri) मावेरीकस क्रिकेट अकॅडमीच्या संघावर 14 धावांनी विजय मिळवून कै.चंद्रकांत साठे चषक व रुपये 25 हजार रुपयाचे पारितोषिक जिंकले. मावेरीकस क्रिकेट अकॅडमी संघाला उपविजेतेपद व रुपये 21 हजाराच्या पारितोषकावर समाधान मानावे लागले. तसेच तृतीय स्थानासाठी एसएसए ओपन टीम संघाने किरण अकॅडमीच्या संघावर 45 धावांनी विजय मिळवून रुपये 10 हजाराचे पारितोषिक पटकावले.

Gahunje : विश्वचषक क्रिकेट सामन्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंग व्यवस्था

या स्पर्धेचा पारितोषक वितरण समारंभ पिंपरी-चिंचवड मनपाचे माजी महापौर आझमभाई पानसरे,पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंडे, पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, लायन राकेश जैन, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक अप्पा ढेरे, पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे, सहसचिव दिलीपसिंह मोहिते, नरेंद्र कदम, मुकेश गुजराथी, हर्ष नायर, हरी देशपांडे, युसुफ आदींच्या हस्ते झाले. या पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रदीप वाघ, प्रास्ताविक राजू कोतवाल व आभार प्रदर्शन संजय शिंदे यांनी केले. या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन राजू कोतवाल, मुकेश गुजराथी, संजय शिंदे, नरेंद्र कदम व प्रदीप वाघ यांनी केले.

 

पारितोषिक वितरणाच्या प्रारंभी जगदीश शेट्टी यांनी स्पर्धा भरविण्याच्या मागील हेतू स्पष्ट केला. पिंपरी चिंचवडमधील क्रीडा क्षेत्र व क्रिकेट वाढीस लागावे व येथून अधिकाधिक उत्तम,चांगले खेळाडू निर्माण व्हावे,येथील खेळाडूंना स्पर्धेतून उत्तम कौशल्य दाखवण्यास मिळावे यासाठी ही स्पर्धा आम्ही आयोजित केली असे जगदीश शेट्टी यावेळेस म्हणाले.या पारितोषक वितरणाच्या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे दिलीपसिंह मोहिते,हर्ष नायर,नरेंद्र कदम,मुकेश गुजराथी,प्रदीप वाघ,राजू कोतवाल,युसुफ,जमाल भाई हेही उपस्थित होते.

या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनिश गायकवाड(मावेरीकस क्रिकेट अकॅडमी),उत्कृष्ट गोलंदाज प्रशांत तेलंगे(एसएसए ओपन टीम),मॅन ऑफ द सिरीज अनिश गायकवाड(मावेरीकस क्रिकेट अकॅडमी),उत्कृष्ट यष्टीरक्षक रुद्रव शिरभाते(किरण क्रिकेट अकॅडमी) व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदित्य एकशिंगे (एसएसए ओपन टीम) यांना घोषित करण्यात आले.

स्पर्धेच्या तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी एसएसए ओपन टीम व किरण क्रिकेट अकॅडमी यांच्यात लढत झाली. एसएसए ओपन टीमने किरण अकॅडमी संघावर 45 धावांनी विजय मिळवून स्पर्धेतील तृतीय क्रमांक मिळवला तर किरण क्रिकेट अकॅडमीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

सामन्याचा धावफलक खालीलप्रमाणे

एसएसए ओपन टीम 6 बाद 146 धावा, 30 षटके. दिग्विजय मोहिते 25,सागर जाधव 45,श्याम नंद्रगे 22,अमेय शेवले 21

श्लोक पांड्या 24/1,शशांक साबळे 24/1,संकेत मोरे 24/1,अथर्व वाव्हळ 38/1.

किरण क्रिकेट अकॅडमी 20षटकांमधे 102 धावा,9बाद.हिमांशू चौगुले 21,सचिन चौधरी 19,अमेय शेवले 15/3,सोहम 17/2,प्रशांत तेलंगे 20/2.एसएसए ओपन टीम 45 धावांनी विजयी झाली.

मॅन ऑफ द मॅच अमेय शेवले (एसएसए ओपन टीम).

अंतिम सामन्याचा धावफलक खालीलप्रमाणे

सतीश दरेकर इलेव्हन व मावेरीकस क्रिकेट अकॅडमी यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात सतीश दरेकर इलेव्हन 14 धावांनी विजयी झाली.

सतीश दरेकर इलेव्हन 20 षटकांमध्ये 167 धावा 5 बाद.

शुभम शेलार 68,जयराज चौधरी 15,वरुण चौधरी 51,हरी सावंत 29/2.

माविरीकस क्रिकेट अकॅडमी सर्व बाद 153 धावा 20 षटके.

अजित गव्हाणे 31,रोमित जोशी 53,संभाजी शिंदे 19,हिरा चौधरी 34/2,किरण मोरे 19/4.

मॅन ऑफ द मॅच किरण मोरे (सतीश दरेकर इलेव्हन).

सतीश दरेकर इलेव्हन चा विजयी संघ फोटो मध्ये बसलेले डावीकडून दिलीप सिंह मोहिते, राजू कोतवाल, रोहिदास कोंडे, अझमभाई पानसरे, जगदीश शेट्टी, आप्पा ढेरे ,राकेश जैन

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.