Dehuroad : क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका असा क्रिकेटचा विश्वचषक सामना ( Dehuroad ) गहुंजे येथील स्टेडियमवर सोमवारी (दि. 30) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी देहूरोड वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल केले आहेत. प्रमुख मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिले आहेत.

Gahunje : विश्वचषक क्रिकेट सामन्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंग व्यवस्था

मुंबईकडून येणारी वाहने
उर्से टोलनाका – किवळे ब्रिज पूर्वी 500 मीटर अंतरावरून डावीकडे वळून पुन्हा डावीकडे यु टर्न घेऊन मामुर्डी अंडरपासच्या उजव्या बाजूने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शवलेल्या पार्किंगकडे जाता येईल.

उर्से टोलनाका – किवळे ब्रिज उतरून मुकाई चौकातून उजव्या बाजूने किवळे ब्रिजखालून कृष्णा हॉटेल शेजारून मामुर्डी अंडरपासच्या डाव्या बाजूने अथवा एमएच 04 बोगद्यातून डावीकडे वळून मामुर्डी अंडरपासच्या उजव्या दिशेने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शवलेल्या पार्किंगकडे जाता येईल.

सोमाटणे फाटा ते सेन्ट्रल चौक देहूरोड ते मामुर्डी  – शितळादेवी अंडरपासकडे डावीकडे वळून यु टर्न घेऊन अंडरपासने पुन्हा डावीकडे वळून लेखा फार्ममार्गे मामुर्डी अंडरपासच्या उजव्या बाजूने कुणाल आयकॉन चौकातून पुढे दर्शवलेल्या पार्किंगकडे जाता येईल.

सेन्ट्रल चौक ते मुकाई चौकातून उजव्या बाजूने किवळे ब्रिज खालून कृष्णा हॉटेल शेजारून मामुर्डी अंडरपासच्या डाव्या बाजूने अथवा एमएच 04 बोगद्यातून डावीकडे वळून मामुर्डी अंडरपासच्या उजव्या दिशेने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शवलेल्या पार्किंगकडे जाता येईल.

पुण्याकडून येणारी वाहने
किवळे ब्रिजच्या पूर्वी डाव्या बाजूने सर्विस रोडवरून कृष्णा हॉटेल शेजारून मामुर्डी अंडरपासने डाव्या अथवा एमएच 04 बोगद्यातून डावीकडे वळून मामुर्डी अंडरपासच्या उजव्या दिशेने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शवलेल्या पार्किंगकडे जाता येईल.

पुणे बाजूकडून येणारी वाहने किवळे ब्रिज उतल्यानंतर लगेच डावीकडे वळून मामुर्डी अंडरपासच्या उजव्या बाजूने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शवलेल्या पार्किंगकडे जाता येईल.

सामना संपल्यानंतर कानेटकर बंगला ते साईनगर परिसरातील पार्किंगमधील वाहने साईनगर सेन्ट्रल चौक मार्गाने जातील.

सेन्ट्रल चौक – साईनगर कानेटकर बंगला चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे.

मैदानाकडे प्रेक्षक येताना व सामना संपल्यानंतर परत जाताना त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना मज्जाव ( Dehuroad ) केला जाईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.