Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Pune) रविवारी (दि. 14 ) शहरातील पुणे स्टेशन, अरोरा टॉवर कॅम्प, विश्रांतवाडी आणि दांडेकर पूल परिसरात  मोठ्या प्रमाणावर मिरवणूक  असते. या मिरवणूकीला नागरिकांची प्रचंड गर्दी असते. म्हणूनच  या  मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे. हा बदल 13 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून 14 एप्रिल रोजी रात्री दोन वाजेपर्यंत राहील. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

Talegaon Dabhade : देविदास सावंत,मारुती केंजळे, हर्षवर्धन कदम यांचा गाडा ठरला घाटाचा राजा

वाहतुकीत करण्यात आलेले बदल –

शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक शाहीर अमर शेख चौकातून वळविण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- शाहीर अमर चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने आरटीओ चौक जहाँगीर चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.

जीपीओ चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक जीपीओ चौकातून वळविण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- जीपीओ चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक नेहरू मेमोरिअल चौकमार्गे इच्छित स्थळी जाईल.

पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक पुणे स्टेशन चौकातून वळविण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग- पुणे स्टेशन अलंकार चौकमार्गे इच्छितस्थळी.

नरपतगीर चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगीर चौकातून वळविण्यात येत आहे.पर्यायी मार्ग – नरपतगीर चौक-15 ऑगस्ट चौक- कमला नेहरू हॉस्पिटल- पवळे चौक – कुंभारवेस चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.बॅनर्जी चौक बॅनर्जी चौकाकडून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक बॅनर्जी चौकातून वळविण्यात येत आहे.पर्यायी मार्ग- बॅनर्जी चौकाकडून पॉवर हाऊस चौक, नरपतगीर चौक, 15 ऑगस्ट चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, पवळे चौक, कुंभारवेस चौकातून इच्छितस्थळी जातील.ससून रुग्णालयातील अत्यावश्यक रुग्णांसाठी डेड हाऊसच्या शेजारील प्रवेशद्वारातून रुग्णवाहिकांना प्रवेश देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी आर.टी.ओ. शेजारी एस.एस.पी.एम.एस. मैदान (दुचाकी व चारचाकी वाहने), पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ (दुचाकी व चारचाकी वाहने) आणि ससून कॉलनी येथे (दुचाकी वाहने) अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. अरोरा टॉवर चौकात येणाऱ्या वाहनचालकांनी तारापोर रस्ता, ईस्ट स्ट्रीट व अन्य रस्त्यांवरील पे-अॅण्ड पार्कच्या ठिकाणी वाहने पार्क (Pune) करावीत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.