Gahunje : विश्वचषक क्रिकेट सामन्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंग व्यवस्था

एमपीसी न्यूज – अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका असा क्रिकेटचा (Gahunje )सामना सोमवारी (दि. 30) गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होत आहे. हा सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येणार असल्याची एकंदर परिस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पार्किंग चोख व्यवस्था केली आहे.

मुंबईकडून येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी पार्किंग मार्ग –
द्रुतगती मार्गाच्या देहूरोड एक्झिट मधून डावीकडे वळावे. त्यानंतर तत्काळ(Gahunje)परत डावीकडून वळून द्रुतगती मार्गालगत मामुर्डी गावाच्या बाजूला असलेल्या सर्विस रोडने स्टेडीयमकडे व पार्किंगकडे जाता येईल.

Railway : रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

द्रुतगती मार्गावरून येणारी वाहने किवळे ब्रिजवरून मुकाई चौक येथून यु टर्न घेऊन कृष्णा चौक मार्गे द्रुतगती मार्गालगत सिम्बायोसिस कॉलेजच्या बाजूकडील सर्विस रस्त्याने स्टेडीयमकडे व पार्किंगकडे जाता येईल.

जुना मुंबई पुणे महामार्गाने येणारी वाहने सोमाटणे फाटा, सेन्ट्रल चौक मार्गे बेंगलोर महामार्गावरील मामुर्डी जकात नाका जवळील अंडरपास व रस्त्याने येणाऱ्या वाहनांना शितळादेवी मंदिर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी आहे.
यासाठी पर्यायी मार्ग – जुना मुंबई पुणे महामार्गाने येणारी वाहने शितळादेवी मंदिर येथून डाव्या बाजूने वळून लेखा फार्म मार्गे असलेल्या सर्विस रोडने स्टेडीयमकडे व पार्किंगकडे जातील.

पुणे बाजूकडून येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी पार्किंग मार्ग
पुणे बेंगलोर महामार्गावरून पवनानदी ब्रिज, हॉटेल सेन्टोसा पास करून किवळे ब्रिजवरून डाव्या बाजूने 200 मीटर वर असलेल्या द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूच्या मार्गाने जाता स्टेडीयम व पार्किंगकडे जाता येईल.

निगडी, हँगिंग ब्रिज कडून येणारी वाहने रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चौक मार्गे कृष्णा चौक येथून उजव्या बाजूला वळून परत द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूला वळून सर्विस रोडने स्टेडीयम व पार्किंगकडे जातील.

स्टेडीयम कडून साईनाथनगर मार्गे जुना मुंबई पुणे महामार्गाकडे येणारा रस्ता एकतर्फी फक्त जाण्यासाठी वापरण्यात येत आहे. साईनाथनगर मार्गे स्टेडीयमकडे येण्यासाठी प्रवेश बंदी आहे.

सेन्ट्रल चौक – साईनगर मार्गे कानेटकर बंगला चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे.

मैदानाकडे प्रेक्षक येताना व सामना संपल्यानंतर परत जाताना त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना मज्जाव केला जाईल.

वाहनांच्या पार्किंगसाठी लिंकवर क्लिक करून पार्किंग व्यवस्थेची माहिती घ्या

https://www.google.com/maps/d/edit?mid=1xi8OQYSXZL2RaLUsy4ue4edJ78rraXQ&usp=sharing

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.