Pimpri : ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणा-या गायत्रीला महापालिकेतर्फे शिष्यवृत्ती

एमपीसी न्यूज – जर्मनी येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम 2023 मध्ये टेबल टेनिस स्पर्धेत(Pimpri) दुहेरी गटात भोसरी येथील गायत्री संजय भालेराव या दिव्यांग खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. या यशाबद्दल महापालिकेने तिला 2 लाख 99 हजारांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे.

गायत्री ही आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू आहे. जर्मनी देशातील बर्लिन (Pimpri )शहरात जून महिन्यात स्पेशल ऑलिम्पिक झाल्या. त्यात गायत्रीने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी गटात विजेतेपद मिळवित सुवर्णपदक जिंकले. ती पुण्यातील बाल कल्याण संस्थेत प्रशिक्षण घेत आहे.

PCMC : यांत्रिकी पध्दतीने रस्ते सफाईला मुहूर्त मिळेना

महापालिकेच्या 18 फेब्रुवारी 2011 च्या ठरावानुसार राष्ट्रकुल, एशियन, ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खुल्या गटांतील खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येते.

राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंना अर्थसहाय केले जाते. त्यात सॅफ ग्रेम, विटर ऑलिम्पिक या स्पर्धाचा तसेच, योगासन व मल्लखांब या दोन खेळांचा नंतर समावेश करण्यात आला. या क्रीडा धोरणानुसार जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्यांना 2 लाख 99 हजारांचे आर्थिक सहाय केले जाते. त्यानुसार गायत्री हिला शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव क्रीडा वभागाने मंजुरीसाठी ठेवला होता. त्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नुकतीच स्थायी समितीची मंजुरी दिली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.