PCMC : यांत्रिकी पध्दतीने रस्ते सफाईला मुहूर्त मिळेना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे मोठे रस्ते(PCMC) आणि मंडई व इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पध्दतीने साफसफाईला सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाने दिलेले चार मुहूर्त हुकले आहेत. त्यामुळे आता पुढील 15 दिवसांत यांत्रिकी पध्दतीने रस्ते सफाईच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात केली जाईल, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, आयुक्तांनी 15 दिवसांचे दिलेले आश्‍वासन पूर्ण होणार का? हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

महापालिकेमार्फत शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचे(PCMC)कामकाज करण्यात येते. निविदा प्रक्रियेद्वारे डी. एम. एंटरप्रायजेस आणि बी.व्ही.जी. इंडिया या दोन संस्थांना दिले होते. त्यांची मुदत संपल्यानंतर 2020 मध्ये शहरातील 18 मीटर व त्यावरील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या कामकाजासाठी पॅकेज निहाय दर मागविण्यात आले होते. शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग करून चार पॅकेजमध्ये हे काम केले जाणार आहे. चार पॅकेजमध्ये ही निविदा होती.

दक्षिण भागासाठी 331 किलोमीटर अंतराचे आणि उत्तर भागासाठी 339.15 किलोमीटर अंतराचे मोठे रस्ते आहेत. त्यामध्ये शहरातील महामार्ग, बीआरटीएस मार्ग व 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते तसेच मंडई व इतर मोकळ्या जागाचा समावेश आहे. प्रत्येक भागासाठी विविध प्रकारचे प्रत्येकी 16 रोड स्वीपर व 16 इतर वाहने आणि 55 कर्मचारी असणार आहेत. 16 रोड स्वीपरच्या मार्फत प्रत्येकी 40 किलोमीटर रस्ते साफ केले जाणार आहेत.

Pune : नवले पूल येथे रस्ता बंद करून टायर जाळल्या प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, शहरातील अंतर्गत रस्ते साफ-सफाईसाठी सद्यस्थितीत 4 एजन्सी कार्यरत आहेत. यासाठी महापालिकेकडून दरमहा 5 कोटी रूपयांचा खर्च करण्यात येत आहे. यांत्रिकी पध्दतीने रस्ते सफाईची निविदा जुलै 2022 मध्ये राबविली होती. सव्वा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही प्रत्यक्षात कामकाज सुरू झालेले नाही. जूनमध्ये पालिकेने चार एजन्सीला वर्क ऑर्डर दिली आहे.

रोड स्वीपर हे जर्मनी आणि इटली येथून आणले आहेत. मोटारींची आरटीओच्या प्रक्रियेमुळे काम रखडल्याची चर्चा होती. यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफ-सफाई करण्याचे आत्तापर्यंत प्रशासनाने चार मुहूर्त दिले होते. ते चारही हुकले असून आरटीओची संपूर्ण प्रक्रिया झाल्याचे आयुक्त सिंह स्वतः सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू करण्यास काय अडचण आहे, यावर ते बोलत नाहीत.

यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाईच्या वाहनांची आरटीओची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या 15 दिवसांत प्रत्यक्षात यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाईच्या कामांना सुरूवात होईल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.