Pune : नवले पूल येथे रस्ता बंद करून टायर जाळल्या प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मराठा आंदोलकांनी काल (मंगळवारी) नवले पुल (Pune)येथे पुणे-बंगळूर हा महामार्ग दोन तासासाठी बंद पाडून तेथे टायर जाळले होते. यावरून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात मराठा संघटनेच्या एकूण 400 ते 500 जणांवर IPC – 143 ,147 ,188,341,336, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37(1)(3) 135 सह क्रिमिनल अमेंडमेंट लॉ ऍक्ट  07 अन्वये अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी पडवळ,(Pune) प्रशांत पवार,निखिल पानसरे,उमेश महाडिक,संतोष साठे , निखिल धुमाळ , समीर घाटे,अभिषेक भरम,विराज सोले, योगेश दसवडकर यांचे सह इतर 400 ते 500 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Maval : जाणीव कविसंमेलन उत्साहात संपन्न

आंदोलनावेळी टायरची जाळपोळ करण्यात आली होती. संपुर्ण रस्ता रोखण्यात आला होता. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सार्वजनिक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आणि गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस स्थानकात IPC – 143 ,147 ,188,341,336, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37(1)(3) 135 सह क्रिमिनल अमेंडमेंट लाॅ ऍक्ट  07 अन्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.