Maval : जाणीव कविसंमेलन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – मावळा युवा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान व डी एम एस फौंडेशनच्या (Maval)संयुक्त विद्यमाने आयोजित कवी संमेलन मंगळवारी (दि.31 ऑक्टोबर) भाविसा भवन येथे यशस्वी रित्या पार पडले.यात एकुण 30 कवीनी आपल्या कविता सादर केल्या.

‘जाणीव’ या विषयावर सामजिक, प्रेम, निसर्ग, मानविय संबध (Maval)अशा विवीध विषयाना हात घालणाऱ्या कविता या कविसंमेलनात सादर करण्यात आल्या. यावेळी कवी कवयित्री भाग्यश्री खुटाळे, यशवंत देव,मकरंद घाणेकर, अश्विनी अशोक पिंगळे, केतकी देशपांडे,प्रणव तडवळकर,शैलजा साने,अपर्णा चितानंद,डॉ.मृदुला कुलकर्णी (खैरनार) शुभदा कोकीळ, चंद्रशेखर कासार , सुषमा हिरेकेरूर, राधिका दाते , अरुण तुळजापूरकर , उज्वला कोंडे,सुरेश शेठ , राहुल भोसले, त्र्यंबक बोरीकर ॲड अंकिता होरणे,स्मिताधारूरकर ,स्मिता कंदले रासने , बाबा ठाकूर,दत्तात्रय खंडाळे,वसंत बिवरे, दिपाराणी गोसावी,सुधाकर धोपटे, संध्या गोळे, शिवणेकर यांनी आपल्या कविता सादर केल्या.

 

Worldcup 2023 : पाकिस्तानची गाडी उशिरा रुळावर; बांगलादेश वर 7 गड्यांनी मात

कार्यक्रमाचा समारोप करताना संमेलनाध्यक्ष वि.ग. सातपुते यांनी जाणीव नेणीव ही कविता सादर केली. डॉ. महेंद्र ठाकूरदास यांनी सर्वांच स्वागत केलं तर विनायक माने यांनी कार्यक्रमांच प्रास्ताविक केल. स्मिता धारूरकर तर कविसंमेलनाच सूत्रसंचालन डॉ.मृदुला कुलकर्णी खैरणार यांनी केलं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.