Worldcup 2023 : पाकिस्तानची गाडी उशिरा रुळावर; बांगलादेश वर 7 गड्यांनी मात

एमपीसी न्यूज- कोलकत्याच्या ईडन गार्डनवर पाकिस्तानने बांगलादेशाचा 7 गडी राखून (Worldcup 2023)सहज पराभव केला. त्यामुळे बांगलादेशचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. तसेच पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग ‘जर तर’ च्या समीकरणांमध्ये अडकला आहे.

नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय यशस्वी ठरवण्यात बांगलादेशच्या फलंदाजांना अपयश आले. सलामीवीर तंजीद हसन हा पहिल्याच षटकातच बाद झाला. शहंशाह आफ्रिदीने त्याला पायचीत केले. लिटन दास 46, महंमदुल्लाह 56 आणि कर्णधार शाकिब अल हसन43 यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर बांगलादेशला 45.1 षटकांत सर्वबाद 204 धावांपर्यंत मजल मारता आली.

LPG Gas : व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात 101.50 रुपये वाढ

पाकिस्तानाच्या गोलंदाजांनी यावेळी भेदक(Worldcup 2023) मारा केला. शहंशाह आफ्रिदी 3, हॅरिस रौफ 2, मोहम्मद वसीम 3, ओसामा मीर 1 यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली.


उत्तरादाखल पाकिस्तानच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करत चौकार व षटकारांची आतिषबाजी केली. सलामीवीर अब्दुल्लाह शफीक 68 धावा आणि फकर जमान 81 धावा यांनी पहिल्या गड्यासाठी 128 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर आलेल्या कर्णधार बाबर हा धावा करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो 9 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेला मोहम्मद रिजवान 21 आणि ईफ्तिकार अहमद 17 यांनी पाकिस्तानच्या विजयावर 33 व्या षटकात शिक्कामोर्तब केले.

पाकिस्तान विरुद्ध झालेल्या 7 व्या सामन्यात बांगलादेशला पराभव पत्करावा लागला, त्यामुळे बांगलादेशचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. तसेच पाकिस्तानने 7 सामन्यांमध्ये 3 विजय आणि 4 पराभव पाहिले आहेत, त्यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा ‘जर तर’च्या समीकरणात अडकल्या आहेत.


ऑस्ट्रेलिया अथवा न्यूझीलंड यांच्यापैकी एकाला आपल्या उर्वरित 3 पैकी 1 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागेल,आणि पाकिस्तापाकिस्तानला आपले उर्वरित सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील, तर पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत दाखल होण्याच्या संधी आहेत. मात्र न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांची सध्याची स्थिती पाहता तसे होण्याच्या शक्यता कमी आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.