Maratha Reservation:मराठा आरक्षणप्रश्नी सह्याद्री अतिथीगृहावर आज सर्वपक्षीय बैठक

एमपीसी न्यूज – राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे.मराठा आरक्षणाविषयी सह्याद्री अतिथीगृहावर(Maratha Reservation ) आज सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय बैठक होत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ,तोडगा काढण्यासाठी ही बैठक आहे.

शरद पवार , अशोक चव्हाण , अंबादास दानवे , उदयनराजे भोसले , संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वपक्षीय नेते बैठकीत हजर राहणार आहेत.

 

Talegaon Dabhade : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तळेगाव येथे मराठा क्रांती चौकात आंदोलन

मराठा आरक्षण आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्यातभर (Maratha Reservation)उमटत आहे.राज्यात शांतता सुव्यवस्था टिकवण्याकरता सर्वपक्षीयांचा सहयोग आवश्यक असल्याचं सरकारचं मत आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये याकरता सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींनी आवाहन करणं गरजेचं असल्याचंही सरकारचं म्हणणं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.