Talegaon Dabhade : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तळेगाव येथे मराठा क्रांती चौकात आंदोलन

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर(Talegaon Dabhade ) आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू असून जरांगे पाटील पुन्हा प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. आठवड्याचा कालावधी उलटून देखील सरकार कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तळेगाव चाकण महामार्गावरील मराठा क्रांती चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (दि.31) सायंकाळी आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि कै.अण्णासाहेब पाटील (Talegaon Dabhade )आणि मराठा क्रांती स्मारकास अभिवादन करुन एक मराठा,लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या.बीडसारखी परिस्थिती राज्य भरात उद्भवू नये. मराठा आरक्षणाचा निर्णय लवकर घ्यावा. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज सधन असला तरी इतर भागातील आर्थिक दुर्बल मराठा समाजासाठी आरक्षणाची गरज आहे.

Pune : मराठा आरक्षणला पाठिंबा,आज पुण्यातील मार्केटयार्ड बंद

सर्व मराठा आमदारांनी आंदोलन करावे.राजकीय जोडे बाजूला ठेवून मराठा समाजासाठी एकत्र या. फक्त पाठींबा देवून उपयोग नाही, समाजासाठी रस्त्यावर या असे आवाहन करुन मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करण्यात विलंब करणा-या सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

2 तारखेपर्यत मराठा आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर,तीव्र आणि प्रक्षोभक आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला.

आशिष खांडगे,नितीन पोटे,बंटी भेगडे,डाॅ.प्रमोद बोराडे,विशाल वाळुंज,भाजपा शहराध्यक्ष अशोक दाभाडे,दिलीप डोळस,मिलिंद अच्युत, सरसेनापती दाभाडे घराण्याचे सत्यशीलराजे दाभाडे,रेश्मा फडतरे, मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चा समन्वयक गणेश भेगडे,अमोल ढोरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे आदींनी मराठा समाजाच्या वतीने तीव्र भावना व्यक्त केल्या.सुत्रसंचालन कल्पेश भगत यांनी केले.

शांतीनाथ जैन श्वेतांबर ट्रस्ट,धनगर समाज, जोशी समाज,आदर्श रिक्षा संघटना,जागरुक वाचक कट्टा,व्यापारी महासंघासह इतर संघटनांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.