Talegaon Dabhade : तब्बल पाच दशकानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी लालपरीने प्रवास करत घेतले रायगडाचे दर्शन

एमपीसी न्यूज – तळेगाव आगारातून किल्ले रायगडसाठी बस (Talegaon Dabhade )सुरू करण्यात आली आहे. सन 1974 – 75 साली अकरावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 45 वयोवृध्द वर्ग मित्रांनी एकत्र येत लालपरीने प्रवास करत रायगडाचे दर्शन घेतले.

येथील जिजामाता चौकात दि.29 रोजी पहाटे 5 वाजता तळेगाव दाभाडे एस टी आगाराचे (Talegaon Dabhade )प्रमुख प्रमोद दहातोंडे व इतिहास तज्ञ डॉ. प्रमोद बोराडे याच्या हस्ते श्रीफळ वाढवून सन 1974 – 75 सालच्या अकरावी मध्ये असलेल्या 45 वर्गमित्रांनी  प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीला पौड मार्गे ताम्हीनी घाटातून रायगडला रोपवे असलेल्या हिरकणी गावात गेले.रोपवेने रायगड किल्यावर गेल्यानंतर किल्ल्याची सर्व माहिती डॉ. प्रमोद बोराडे व डॉ.सई बोराडे यांनी दिली. येताना पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन. रात्री 11 वाजता तळेगाव येथे परत आले.

सन 1974 – 75 साली अकरावी मध्ये असलेल्या सर्वांची वयोमर्यादा 65 वर्षांच्य पुढे गेली असताना रायगड दर्शन हि सहल पार पडली.याचा सर्व सहभागी वृध्द विद्यार्थ्याना खूप आनंद झाला. या सहलीचे नियोजन व पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन तळेगाव आगार मधून सुरु केलेल्या किल्ले रायगड दर्शन सेवेचा चांगला लाभ मिळाल्याचे मत सुरेश खांडवे, कुंडलिक भेगडे, विनायक करंडे, माधव संत, मधूसुदन खळदे, रघुनाथ नाईकरे, पंढरीनाथ कुदळे, सोमाकांत टकले, विनय चंद्र दिघे, वासंती पाबळे, सुलभा परळीकर यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.