LPG Gas : व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात 101.50 रुपये वाढ

एमपीसी न्यूज – सर्वसामान्यांना ऐन सणासुदीच्या काळात महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून एलपीजी गॅसच्या दरांत (LPG Gas )100 रुपयांची वाढ झाली. 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमतींत ही वाढ झाली आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आला नाही. कमर्शियल सिलेंडरच्या दरांत वाढ झाल्याने याचा परिणाम खाद्य उद्योग आणि रेस्टॉरंट व्यवसायावर दिसून येईल.

आज, 1 नोव्हेंबरपासून, मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरची(LPG Gas )किंमत 1785.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी गॅस महागला आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1684 रुपये होते.

Talegaon Dabhade : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तळेगाव येथे मराठा क्रांती चौकात आंदोलन

गेल्या महिन्यातही तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत 209 रुपयांनी वाढ केले होती. सलग दुसऱ्या महिन्यात तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजीच्या किमतींत वाढ केली आहे.

1 नोव्हेंबर रोजी आज घरगुती एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नाही . घरगुती गॅस आहे त्याच दरात मिळेल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.