Pune News : गॅस दर वाढीवरून रुपाली पाटील ठोंबरे यांचा केंद्रावर हल्ला

एमपीसी न्यूज – सततच्या होणारी महागाई यामुळे सामान्यांचे आर्थिक गणित दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. त्यातच आज पुन्हा घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी केंद्रावर आपला निशाणा साधला आहे.त्यातच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे व्टीटच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे.

महागाईचा भोंगा वाजला 50 रुपयाने गॅस वाढला. चूल सोडून गॅस वापरा म्हणणारे, गॅसमध्येच मोठी वाढ केली आहे. परत चुलीकडे जावेच लागणार,पोटाचा प्रश्न आहे ना. कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र बीजेपी हटाव देश बचायो असे व्टीट करीत केंद्र सरकारवर हल्ला चढविला आहे.

 

घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये आजपासून 50 रुपयांनी वाढ झाली आहे.त्यामुळे 14.2 किलोच्या एका सिलेंडरसाठी आता 999.50 रुपये द्यावे लागतील. हे दर आजपासून लागू झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.