Talegaon Dabhade Fraud : बनावट दागिने तारण ठेऊन मुथ्थुट फायनान्सची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बनावट दागिन्याला (Talegaon Dabhade Fraud) सोन्याचा मुलामा चढवून; ते खरे असल्याचे भासवून तारण ठेवत दोघांनी मुथ्थुट फायनान्स कंपनीची दोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 2 जुलै 2021 ते 6 मे 2022 दरम्यान तळेगाव दाभाडे येथे घडला

Rahatani News: दिवसाढवळ्या ऑफीसचे कुलूप तोडून दीड लाखाचे साहित्य चोरीला

याप्रकरणी जितेंद्र सुर्यकांत शिंदे (रा. राव कॉलनी) आणि नितीन दत्तात्रय पंडीत (वय 40 रा. माळीआळी, तळेगाव दाभाडे) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याबाबत भगवान पंढरीनाथ शिवरकर (वय 36, रा. यशवंतनगर, तळेगावदाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस (Talegaon Dabhade Fraud) ठाण्यात फिर्याद दिली.

मुथ्थुट फायनान्स कंपनीची फसवणूक

शिंदे, पंडीत यांनी आपआपसात संगनमत केले. मुथ्थुट फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी बनावट दागिन्यावर जाडसर सोन्याचा मुलाला चढविला. ते सोने खरे असल्याचे फिर्यादीस सांगितले. ते बनावट सोने तारण ठेऊन कंपनीची 2 लाख 1 हजार 44 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.