Rahatani News: दिवसाढवळ्या ऑफीसचे कुलूप तोडून दीड लाखाचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – दिवसाढवळ्या चोरांनी ऑफीसचे कुलूप तोडून आतमध्ये घुसून विविध प्रकारचे 1 लाख 42 हजार 777 रुपयांचे साहित्य चोरुन नेले. हा प्रकार गुरुवारी (दि.5 मे) सकाळी 7 ते 8.30 दरम्यान रहाटणीतील (Rahatani News) रिचमंड पार्क बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावर घडला.

याप्रकरणी शैलेश मोहन म्हात्रे (वय 40, रा. कोंढवे धावडे, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad loan fraud : लोन काढून देण्याच्या आमिषाने तिघांची फसवणूक

रहाटणीतील रिचमंड पार्क बिल्डींग येथे स्टोअर किपर म्हणून फिर्यादी म्हात्रे कामाला आहेत. गुरुवारी सकाळी चोरट्याने पहिल्या मजल्यावरील ऑफीसचे कुलूप तोडले. टेबलाच्या ड्रॉवरमधील चावी घेऊन स्टोअर उघडले. त्यातील सीपी अॅग्युलर स्टॉप कॉक, सीपी बीआयबी कॉक, सीपी डायर्व्हरटर स्पाउट, सीपी हेल्थ फॉसेट विथ, मीटर, फ्लेक्झीबल ट्युब विथ वॉल हुक, सीपी ओव्हरहेड शॉवर रोझ, सीपी सिंक कॉक वॉल माउटींग, सीपी वेस्ट कपलिंग 32 एमएम साईझ फुल थ्रेड असे 1 लाख 42 हजार 777 किंमतीचे साहित्य चोरुन नेले.  या घटनेचा वाकड (Rahatani News) पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.