Kalbhairavnath Kesari: हर्षद सदगीर आणि पृथ्वीराज पाटील ठरले काळभैरवनाथ केसरीचे मानकरी

एमपीसी न्यूज – पिंपरीवाघेरे गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज (Kalbhairavnath Kesari) उत्सव निमित्त आयोजित कुस्ती आखाड्यामध्ये पै. हर्षद सदगीर व पै. पृथ्वीराज पाटील हे काळभैरवनाथ केसरी किताबाचे मानकरी ठरले आहेत.

पिंपरी वाघेरे गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त 5 मे रोजी नवमहाराष्ट्र विद्यालय क्रिडांगण येथे उत्सव कमिटीच्या वतीने कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक वर्षांची कुस्ती परंपरा असलेले पिंपरीवाघेरे ग्रामस्थांच्या वतीने सुमारे 2 लाख 61 हजार,  51 हजार, 41  हजार, 31 हजार अशी  अनेक बक्षीस कुस्ती आखाडासाठी जाहीर करण्यात आली होती. यावेळी एकूण 56 कुस्त्यांचे रंगतदार सामने पाहण्याची संधी हजारो कुस्तीप्रेमी नागरिकांना मिळाली.

Chinchwad News: आशा भोसले पुरस्कार  डॉ. सलील कुलकर्णी यांना जाहीर;  रविवारी पुरस्कार प्रदान सोहळा

काळभैरवनाथ केसरी किताबाचे मानकरी

यावेळी महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज पाटील विरुद्ध हिंदकेसरी पै. नवीन कुमार तसेच पै. हर्षद सदगीर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे यांच्यात श्वास रोखून धरणारी व उत्कंठावर्धक अशा झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये पै. हर्षद सदगीर व पै. पृथ्वीराज पाटील हे काळभैरवनाथ केसरी (Kalbhairavnath Kesari) किताबाचे मानकरी ठरले आहेत.

उत्सव समितीच्या वतीने चांदीची गदा

त्यांना कै.रघुनाथ दिनाजी वाघेरे यांच्या स्मरणार्थ माजी नगरसेवक संदिप वाघेरे यांच्या वतीने दोन लाख रुपये रोख व श्री. काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने चांदीची गदा देण्यात आली. कुस्ती स्पर्धेचे निवेदन हंगेश्वर धायगुडे, कुस्तीचे पंच वस्ताद पैलवान निवृत्ती काकडे यांनी केले. तसेच, मान्यवर पाहुण्यांचे स्वागत हलगी वादक बापू आवळे यांनी केले.

Pune News : सिंगापूर मधील ग्रेस लेडीज अकॅडमीतर्फे रिता शेटीया यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

यावेळी उत्सव (Kalbhairavnath Kesari) कमिटीचे अध्यक्ष पै. संदीप कापसे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, माजी विरोधी पक्ष नेते दत्तात्रय वाघेरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघेरे, बाळासाहेब वाघेरे, पै. खंडू वाळूंज, पै. संतोष माचुत्रे, तानाजी वाघेरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.