Wakad loan fraud : लोन काढून देण्याच्या आमिषाने तिघांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बँकेचे लोन काढून देतो (Wakad loan fraud) असे सांगून दोन ठगांनी तिघांची फसवणूक केल्याचा प्रकार थेरगाव येथे उघडकीस आला.

याप्रकरणी अभिजीत तानाजी आढाव (वय 40, रा. भवानी पेठ पुणे), सनी (वय, पूर्ण नाव समजू शकले नाही. रा. चिंचवड) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अंकुश गजानन पोलकम (वय 50, रा. सुदर्शन कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Tathwade News: व्हर्च्युल करंसी स्वस्तात देण्याच्या आमिषाने 10 लाखांची फसवणूक

फिर्यादीच्या नावे 40 हजाराचे लोन – 

आरोपींनी जानेवारी 2022 मध्ये फिर्यादी पोलकम (Wakad loan fraud) यांना पाच लाखाचे लोन कोढून देतो असे सांगितले. आरोपीनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला वाकड येथील क्रोमा शोरुम जवळ बोलावून घेतले. सिवील स्कोअर वाढवून देतो असे सांगून फिर्यादी पोलकम यांच्या नावावर एचडीएफसी फायनान्सचे 40 हजार रुपयांचे लोन घेतले. त्यातून मोबाईल खरेदी केली. त्याचप्रमाणे अलका केदारी (रा. थेरगाव) यांची 40 हजार आणि योगिता कैलास पाटील यांची 23 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा वाकड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जे.एस.गिरनार तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.