Tathwade News: व्हर्च्युल करंसी स्वस्तात देण्याच्या आमिषाने 10 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – युएसडीटी डॉलर ही व्हर्च्युल करंसी 5 रुपयांप्रमाणे स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 26 फेब्रुवारी ते 6 मे 2022 दरम्यान ताथवडे येथे घडला.

याप्रकरणी प्रसाद नागेश शेट्टी (वय 31 रा. कोथरुड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम हवा (रा. काटेवस्ती, पुनावळे) आणि केशव देवकर (पूर्ण नाव, पत्ता समजू शकला नाही) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी व फिर्यादी यांची जुनी ओळख आहे. आरोपीने त्याच्याकडील मौल्यवन वस्तु फिर्यादी शेट्टी याला दाखविल्या. त्याचा विश्वास संपादित केला. त्यांच्याकडील युएसडीटी डॉलर ही व्हर्च्युल कंरसी 5 रुपये दराने स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादीला ताथवडेतील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. फिर्यादीकडून 10 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. वाकड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.