Talegaon Dabhade : रमजान ईद निमित्त तळेगाव येथे लहान मुलांना भेटवस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज – मुस्लिम धर्मियांच्या रमजान ईद (Talegaon Dabhade) या पवित्र सणानिमित्त मौला अली यंग फ्रेंड सर्कलच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. साजिद शेख मित्र परिवाराकडून लहान मुलांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

 

तसेच, अल्पसंख्यांक सेल तळेगाव अध्यक्ष सोहेल सिकीलकर यांच्या वतीने सर्व उपस्थित बांधवाना शीर-खुर्माचे आयोजन करण्यात आले होते व इरफान सिकीलकर, सोहेल नालबंद यांनी विशेष मेहनत घेऊन बनवलेला फिरता देखावा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण होता.

प्रामुख्याने अल्पसंख्यांक सेल तळेगाव (Talegaon Dabhade) अध्यक्ष सोहेल सिकीलकर, सरफराज (बबलू) नालबंद, मन्सूरभाई शहा, आफताब भाई सिकीलकर, मंडळाचे अध्यक्ष जोयेब सिकीलकर, एजाज सिकीलकर, इरफान सिकीलकर, शहाबाज सिकीलकर, जावेद शेख, सुफियान सिकीलकर, आफाक सिकीलकर, मुशरफ सिकीलकर, अकील नालबंद मोईन सिकीलकर, अरबाज सिकीलकर, उमेर सिकीलकर आय्याज नालबंद, सादभाई जमादार, आकिब मणियार, आवेज शेख, गुलामअली सिकीलकर, रईस नालबंद, शोएब नालबंद, सोहेल नालबंद, तारिक गुजर, फैजल सिकीलकर, अशरफ नालबंद, तौसिफ़ खान, मोहसीन पठाण, शोएब सय्यद,  शाहिद अत्तार, दानिश नालबंद, शर्मील खान, अयान शेख, अयान नालबंद, अमान नालबंद आदी सर्व प्रमुख उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.