Chikhali molestation crime : तरुणाने केला 12 वर्षीय मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज –  तुप गरम करण्याच्या बहाण्याने घरात जाऊन (Chikhali molestation crime) अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-याला पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी (दि.6) सकाळी 11 च्या सुमारास चिखली येथे घडली.

नवनाथ विष्णु वायकर (वय 28, रा. बांदलवाडी, इंदापूर रोड, बारामती, जिल्हा पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News of Pimpri theft : फळांच्या दुकानात चोरी – शिट्टी वाजवल्याने सुरक्षारक्षकाला मारहाण

आईने केली तक्रार – 

याबाबत अल्पवयीन मुलीच्या 34 वर्षीय आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद (Chikhali molestation crime) दिली. शुक्रवारी फिर्यादी यांची 12 वर्षाची मुलगी एकटीच घरात होती. त्यावेळी आरोपी नवनाथ हा तुप गरम करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या घरामध्ये गेला. त्याने 12 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.