News of Pimpri theft : फळांच्या दुकानात चोरी – शिट्टी वाजवल्याने सुरक्षारक्षकाला मारहाण

एमपीसी न्यूज – फळाच्या दुकानातील (News of Pimpri theft) फळे रोडवर फेकून देत पैसे चोरुन घेऊन जात असताना सुरक्षारक्षकाने शिट्टी मारल्याने सहा जणांच्या टोळक्याने सुरक्षारक्षकाला मारहाण करत त्याच्याकडील 10 हजार रुपये जबरदस्तीने काढून नेले. हा प्रकार गुरुवारी (दि.5मे) रात्री पावणेबाराच्या सुमारास पिंपरीतील साई चौक, भुयारी मार्गालगत घडला.

याप्रकरणी अंकुश विठ्ठल गायकवाड (वय 40, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thergaon Crime: आम्ही इथले भाई आहोत म्हणत थेरगावमध्ये टोळक्यांचा धुडगूस

फळे रस्त्यावर फेकून दिली –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांचे पिंपरीतील भुयारी मार्गालगत फळांचे (News of Pimpri theft) दुकान आहे. गुरुवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर पावणेबाराच्या सुमारास आरोपींनी दुकानाची ताडपत्री फाडली. दुकानात घुसून फळे अस्ताव्यस्त रोडवर फेकून दिली. फळांचे नुकसान केले.  दुकानात निळ्या बॅगमध्ये ठेवलेले फळविक्रीतील 2 हजार रुपये घेऊन चालले असताना; त्याचवेळी दुकाना शेजारील पार्किंगच्या सुरक्षारक्षकाने शिट्टी वाजवून आरोपींना हाटकले.  त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी सुरक्षारक्षक फुरणसिंग चंद यांना शिवीगाळ केली.

Pune News : भाषणातून फटकेबाजी करणाऱ्या संजय राऊत यांची पुण्यातील क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी

एका आरोपीने पार्किंगच्या गेटवरील लोखंडी जाळीवरुन उडी मारुन आत जात चंद यांना शिट्टी का वाजविली अशी विचारणा केली. शिवीगाळ करत त्यांच्या खिशातील 10 हजार रुपये काढून नेले.  या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.