Pune News : भाषणातून फटकेबाजी करणाऱ्या संजय राऊत यांची पुण्यातील क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी

एमपीसी न्यूज : नेहमीच विरोधकांच्या टीकेला प्रतिउत्तर देणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज क्रिकेट च्या मैदानात उतरून चांगलीच फटकेबाजी केली. येरव्ही राऊत भाषणातून अनेकांचा समाचार घेतात. संजय राऊत हे खेड मधील आंबेगाव येथे आले होते. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी क्रिकेटच्या मैदानात स्पर्धा आयोजित केली आहे. तिथं राऊत यांनी भेट दिली. तेव्हा त्यांनी फलंदाजी करत फटकेबाजी केली. संजय राऊत हे शिवसेनेचे म्हत्वाचे नेते मानले जातात. त्यांच्या भाषणातून अनेक नेत्यांची, फिरकी घेतल्याचं अनेकदा आपण पाहिलंय.

पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, मी ऑलराऊंडर आहे, मी मुंबईचा आहे. पण आजतागायत मी क्रिकेटच्या मैदानात कधीच उतरलो नाही, क्रिकेटची मॅच सुद्धा कधी पाहिली नाही. पण मी मैदानात उतरलो की बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, पंचगिरी सर्व काही करू शकतो. अस त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. पत्रकार परिषद संपताच माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला भेट देऊन संजय राऊत थेट क्रिकेट च्या मैदानात उतरले. तिथं त्यांनी बॅटिंग करत फटकेबाजी केली, कार्यकर्ते आणि प्रेक्षकांची मने जिंकली.

आयपीएल सुरु आहे हे बरोबर आहे, पण ही एसपीएल (क्रिकेट स्पर्धा) त्यापेक्षा कमी नाही. आयपीएलच्या मैदानात वेगवेगळे झेंडे असतात, इथं मात्र एकच भगवा झेंडा आहे. त्यामुळे हारजीत कोणाची ही झाली तरी जिंकणार भगवाच हे निश्चित आहे. या मैदानात रणजी सामने व्हायला हवेत. पश्चिम महाराष्ट्रातील आदर्शवत असं हे मैदान व्हावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. मी मैदानात आल्याने पंच बुचकळ्यात पडलेत. त्यांनी सामना थांबविला आहे. आता आपण मैदानात उतरुया, मग बघू पुढे..अस राऊत यांनी म्हटलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.