Mumbai News : एचडीएफसीचा झटका; कर्जदरात 0.30 टक्क्यांनी वाढ

एमपीसी न्यूज – सर्वसामान्या माणसाला सध्या एकामागून एक धक्के बसू लांगले आहेत सकाळीच अगदी घरगुती गॅसच्या दरात वाढ झाली तर आता दुपारी कर्ज घेणेसुध्दा महाग झाले.

 

गृह वित्त पुरवठादार एचडीएफसीने आठवडाभरात आज पुन्हा व्याजदरात वाढ केली आहे. एचडीएफसीने कर्जदरात 0.30 टक्क्यांनी वाढ केली आहे. या दरवाढीमुऴे एचडीएफसीचे नवीन कर्ज आणि विद्यामान मासिक हप्ता वाढणार आहे.

 

एचडीएफसीने गृह कर्जावरील रिटेल प्राइम लेंडिग रेट (किरकोळ कर्जदर) 0.30 टक्क्याने वाढविला आहे. 9 मेपासून नवीन कर्जदर लागू झाला आहे. यापुर्वी रविवारी 1 मे रोजी एचडीएफसीने रिटेल प्राइम लेंडिग रेट 0.05 टक्कयांनी वाढविला होता.

 

एचडीएफसीने प्रसिध्दस दिलेल्या निवेदनानुसार कर्जाचा दर 7 टक्के ते 7.45 टक्क्यांच्या दरम्यानचा आहे. कर्जदाराचा सिबिल स्कोअर, कर्जाची रक्कम यावर कर्जदार ठरविला जातो.सिबील स्कोअर 750 हून अधिक असल्यास नवीन कर्जाचा दर 7 टक्के आहे. 30 लाखांपर्यंतच्या कर्जावर महिलांसाठी 7.05 टक्के, तर इतरांसाठी 7.10 टक्के आहे. 30 लाख ते 75 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी महिला कर्जदारांना 7.30 टक्के इतका कर्जदर आहे तर इतरांसाठी 7.35 टक्के इतका कर्जदर आहे. 75 लाए आणि त्याहून अधिक रकमेच्या कर्जासाठी महिलांकरीता 7.40 टक्के तर इतरांसाठी 7.45 टक्के नवीन कर्जदर राहील. एचडीएफसी महिलांसाठी गृहकर्जावर 0.05 टक्के सवलत देते.

 

गेल्याच महिन्यात एसबीआय, बडोदा बॅंक, कोटक बॅंक या बॅंकांनी एमसीएलआर दरात वाढ केली होती. ज्यामुळे कर्जदारांचा मासिक हप्त्याचा भार वाढला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.