Pimple Saudagar: सौदागर येथे मनोज जरांगे यांच्या समर्थनात साखळी उपोषण

एमपीसी न्यूज- सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन (Pimple Saudagar)आरक्षणाची दारे खुले करावी, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात पिंपळे सौदागर येथील पी.के चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या उपोषणात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Maval : जाणीव कविसंमेलन उत्साहात संपन्न

यावेळी उपोषण स्थळी मनोज जरांगे पाटील यांच्या पूर्वीचा (Pimple Saudagar)भाषणाच्या क्लिप लावून त्यांचे विचार ऐकण्यात येत आहेत.


तसेच पिंपळे सौदागर येथे सर्व राजकीय नेत्यांना प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. याबाबत शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. यामध्ये, “आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा” अशी तंबी राजकीय नेत्यांना देण्यात आली आहे. :आजवर लढलो मातीसाठी एक लढा जातीसाठी”, “जो समाजाला मानत नाही समाज त्याला मानत नाही” असा मजकूर त्यामध्ये लिहिण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.