Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ पुण्यात वकिलांचा मशाल मोर्चा

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ पुणे येथे वकिलांचा मशाल मोर्चा (Maratha Reservation)होणार आहे. बुधवारी (दि. 1) दुपारी दोन वाजता हा मोर्चा शिवाजी पुतळा एसएसपीएमएस शाळा शिवाजीनगर ते महाराणी जिजाऊ पुतळा, लाल महाल या मार्गावरून निघणार आहे.

मराठा आरक्षणासाठी मुस्लीम बांधवांनी देखील पाठींबा दिला (Maratha Reservation) आहे. तसेच अनेक संघटनांकडून देखील मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा दिला जात आहे. त्यातच आता पुणे शहरात वकील बांधवांकडून मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

Pimple Saudagar: सौदागर येथे मनोज जरांगे यांच्या समर्थनात साखळी उपोषण

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर यासह जिल्ह्याच्या विविध न्यायालयांमधील वकील बांधव या मशाल मोर्चात सहभागी होणार आहेत.

मंगळवारी राज्य शासनाने एक जीआर काढला आहे. त्यामध्ये ज्यांच्याकडे कुणबी नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे म्हटले आहे. मात्र मराठा समाजाकडून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे शासनाने मंगळवारी काढलेला आदेश आम्हाला मान्य नसल्याचे मराठा समाजाकडून सांगितले जात आहे.

 

शासनाने सरसकट सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर करावे अन्यथा आणखी वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.