Pimpri : युवती सेना अधिकारी शर्वरी जळमकर यांनी स्वीकारली साक्षीच्या शिक्षणाची जबाबदारी

एमपीसी न्यूज – शिवसेनेचा वर्धापन दिन व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, बुधवार (दि. 19) रोजी शिवसेनेच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या युवती सेना अधिकारी शर्वरी जळमकर यांनी अनोखा उपक्रम राबविला. रहाटणी येथे राहणाऱ्या साक्षी कांबळे या विद्यार्थिनीचा वार्षिक शिक्षणाचा खर्च व शैक्षणिक वर्षाची सर्व जबाबदारी त्यांनी स्वीकारून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

इयत्ता 7 वीत शिकणाऱ्या साक्षीचे वडील हयात नाहीत. तिची आई धुण्या-भांड्याचे काम करते. एकूणच साक्षीच्या घरची परिस्थिती बेताची आहे. अशा परिस्थितीत तिच्या शिक्षणाचा खर्च मुलीच्या आईला पूर्ण करणे अशक्य होत होते. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शर्वरी जळमकर यांनी साक्षीच्या शिक्षणाची जबाबदारी घेत अनोखा पायंडा रचला. साक्षीच्या घरी जाऊन तिच्या आईला त्यांनी साक्षीच्या शिक्षणाची जाबाबदारी घेत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी युवतीसेनेच्या अमृता सुपेकर, सावली शिंदे, क्रांती शिंदे तसेच महिला आघाडी वाल्हेकरवाडी उपविभागाच्या सारिका शिंदे व सर्व युवती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.