Pimpri : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर वार

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर चाकूने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ सेनेटरी चाळीत घडली.

विकी सतीश ठोकळ (वय 22, रा. सेनेटरी चाळ, पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अविनाश काशिनाथ काळे (वय 25), कृष्णा काशिनाथ काळे (वय 20, दोघे रा. काळेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकी सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी विकी यांच्या घरी आले. दोघांनी मिळून विकी यांना मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. तसेच आरोपींनी चाकूने विकी यांच्या डोक्यात वार केला. यामध्ये विकी गंभीर जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.